महाराष्ट्र सोसत असलेल्या लोडशेडिंगच्या झळा सात वर्षांपूवीर् अमेरिकेतील कॅलिफोनिर्यालाही सोसाव्या लागल्या होत्या. ही समस्या दूर करण्यासाठी तेव्हा वापरण्यात आलेला फॉर्म्युला डोळ्यासमोर ठेवून राज्यातील वीजटंचाईवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि कॅलिफोनिर्या येथील बर्कले प्रयोगशाळा यांच्यात संशोधन करार झाला आहे.
महत्त्वाचे म्हणजे बर्कले प्रयोगशाळेतील जयंत साठ्ये व अमोल फडके या दोघा पुणेकर संशोधकांचा त्यात सहभाग असेल.
भारत आणि अमेरिकतील अशा प्रकारचा हा पहिलाच करार असून महाराष्ट्र वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष प्रमोद देव आणि बर्कले प्रयोगशाळेचे संचालक स्टीव्ह चू यांनी त्यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या आधारे वीज निमिर्तीबाबत संशोधन करणारी बर्कले प्रयोगशाळा ही जगातली आघाडीची संस्था आहे.
Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments