मुंबईत घर परवडत नसेल तर दुबईत फ्लॅट घ्या असे म्हणण्राची वेळ आली आहे. दुबईतील अत्यंत प्रतिष्ठित अशा बुर्ज खलिजा या शंभर मजली टॉवरमध्ये आलीशान प्लॅट पडेल फक्त ३००० रूपये चौरस फुटाने. मुंबईत सोडाच, पण ठाण्यातही या भावाने फ्लॅट मिळत नाही.

तुलनाच करायची झाली तर, नरीमन पॉइंट भागात असलेल्या एनसीपीए अपार्टमेंटमध्ये फ्लॅटची किंमत आहे ३०,००० रूपये प्रति चौरस फुट. मुंबईत भांडुप आणि कांजुर या भागातही भाव किमान चार हजार रूपये आहे. अंबरनाथ, डोंबिवली, कल्याण येथे तीन हजार रूपये भावाने फ्लॅट उपलब्ध आहेत पण त्यांचा बांधकामाचा दर्जा दुबईतील सर्वसामान्य वसाहतीपेक्षाही कमी आहे.
4 Comments   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links