मुंबईतील एक लाखांहून अधिक रिक्षावाल्यांनी व त्यांच्या नेत्यांनी केलेल्या दादागिरीपुढे नमून राज्य सरकारने रिक्षाचे भाडे दोन रुपयांनी वाढवून दिले.

त्यामुळे गुरुवार सकाळपासून उपनगरवासी व ठाणेकरांना किमान भाड्यासाठी ११ रुपये मोजावे लागणार आहेत. एक रुपया सुट्टे देण्याचा निर्माण होणारा प्रश्न व महागाईचा निकष लक्षात घेऊन १० रुपये भाडे योग्य असल्याचे ग्राहक संघटनांनी ठामपणे मांडले.

पण सरकारने रिक्षावाल्यांपुढे गुडघे टेकले.
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links