मुंबईत येणाऱ्या परप्रांतियांचा मुद्दा नेहमीच गाजत असला तरी, परप्रांतातून मुंबईत येणाऱ्यांचा ओघ कायम असल्याचे मुंबईच्या २००९ सालच्या मानवी विकास अहवालातात स्पष्ट झाले आहे.

१९९१ ते २००१ या दशकात परप्रांतातून येणाऱ्यांचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले आहे. महाराष्ट्राच्या इतर भागातून मंुबईत येणाऱ्यांचे प्रमाण मात्र कमी झाले आहे.

भारताच्या परराज्यातून मंुबईत आलेल्यांचे प्रमाण ५६.५० टक्क्यांवरून १० वर्षांत ६१.०१ वर गेले आहे. त्यात उत्तरप्रदेशचा वाटा २४.२८ टक्के आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून येणाऱ्यांचे प्रमाण ३७.४० टक्के आहे. बिहारमधून येणाऱ्यांचा टक्काही वाढला असून हे प्रमाण ०.३७ टक्क्यावरून ०.७७ वर गेले आहे.
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links