होळी आणि रंगपंचमीच्या आनंदाचा केमिकल लोच्या झाल्यामुळे या सणाचा पार विचका झालाय. या रंगात रंगून केमिकल होळी खेळणारे आहेत. पण हे रंग टाळण्यासाठी घरात लपणाऱ्यांचीही कमी नाही. जुहूतल्या वरिष्ठ नागरिकांच्या एका संघटनेने हे चित्र बदलण्याचा चंग बांधलाय. ही मंडळी इकोफ्रेण्डली होळी खेळण्याचं नुसतं आवाहन करणार नाहीये, तर पळसाची फुलं, गुलाल, अत्तर, गुलाबजल अशी टनावारी इकोफ्रेण्डली रंगसामग्री लोकांना उपलब्ध करून देणार आहेत, तीही अगदी फुकट.
7 Comments   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links