शहरात १९९५ पर्यंतच्या झोपड्या कायम करण्याचा निर्णय शिवसेना-भाजप युतीच्या काळात घेण्यात आला असून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अंधारात ठेवून हा निर्णय घेतला, असा गौप्यस्फोट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी केला.
शिवसेनेत असताना आपण या झोपड्यांविरोधात एक सादरीकरणही केले होते. मात्र, युतीची सत्ता असताना मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी १९९५ पर्यंतच्या झोपड्या कायम करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याची कोणतीही माहिती शिवसेनाप्रमुखांना देण्यात आली नव्हती, असे राज यावेळी म्हणाले.
1 Comment   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links