नवी दिल्ली,(प्रे.ट्र.) - गोध्रा हत्याकांडानंतरच्या दंगलींच्या फेरतपासासाठी गुजरात सरकारने केंद्रीय अन्वेषण विभागाचे माजी संचालक श्री. आर्.के. राघवन यांच्या नेतृत्वाखाली विशेष चौकशी पथकाची स्थापना करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिला.
`या विशेष चौकशी पथकाने तीन महिन्यांत त्याचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सादर करावा', असे न्या. अरिजित पसायत यांच्या नेतृत्वाखालील खंडपिठाने त्याच्या आदेशात म्हटले आहे.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज हा आदेश दिला. (गुजरात दंगलींतील मुसलमानांसाठी याचिका दाखल करणार्या मुसलमानधार्जिण्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला गोध्रा येथे मुसलमानांनी जिवंत जाळलेल्या हिंदूंविषयी काही करावेसे का वाटले नाही ? असले पक्षपाती आयोग हवेत कशाला ? - संपादक) राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या याचिकेच्या द्वारे गुजरातमधील दंगलींची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत फेरतपासणी करण्याची मागणी केली आहे. (काश्मीरमध्ये मुसलमान दहशतवाद्यांनी ठार मारलेल्या हजारो हिंदूंची आठवण कधी मानवाधिकारवाल्यांना येते का ? - संपादक) या प्रकरणाची सुनावणी गुजरातच्या बाहेर करण्याची विनंतीही त्याने केली आहे. गुजरात दंगलीतील काही साक्षीदार भीतीपोटी दूर राहिल्याने ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्याचे आयोगाने म्हटले आहे.
Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments