आजवर अखिल भारतीय पातळीवर राहिलेले आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातील शहरांत आणि गावांत भरवले जाणारे अ. भा. मराठी नाट्य परिषदेचे नव्वदावे नाट्यसंमेलन पहिल्यांदाच देशाची वेस ओलांडत आहे.
अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या पावलावर पाऊल टाकत, पण त्याच्याप्रमाणे वादग्रस्त न होण्याची खबरदारी घेत हे नाट्यसंमेलन २९ ते ३१ मे या कालावधीत न्यू जर्सी येथे भरणार आहे.
या संमेलनाची तयारी अमेरिकेत आणि महाराष्ट्रात एकाचवेळी सुरू झाली असून नाट्यपरिषदेचे विमान २०० मान्यवर कलावंतांना घेऊन मे महिन्यात अमेरिकेच्या दिशेने उडणार आहे.
Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments