इतर राज्यभाषा अभिजात भाषेचे स्थान मिळवण्यासाठी धडपडत असतांना मराठीची होणारी विटंबना जाणा !
कन्नड आणि तेलगू या भाषा अभिजात भाषेचे स्थान मिळावे म्हणून प्रयत्नशील आहेत. मराठीची मात्र विटंबना होत आहे; कारण मराठी राज्यकर्त्यांना खुर्ची टिकवण्यापेक्षा मोठे ध्येय दिसत नाही. मुसलमानांना प्रसन्न करून खुर्ची टिकवता येत असेल, तर हे विलासी राज्यकर्ते मराठीचा बळी देण्यास कमी करणार नाहीत !
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बोरीबंदरजवळील मुख्य कार्यालयात निवडून आलेल्या नगरसेवकांच्या पक्षांना कार्यालयासाठी एक-दोन खोल्यांची जागा पाच वर्षांसाठी दिलेली असते. अशा कार्यालयावरील नावाची पाटी समाजवादी पक्षाने उर्दूत लावली. त्यावरून धुरळा उडाला आहे. आयुक्त श्री. जयराज फाटक यांनी पालिकेचा कारभार मराठीतून करण्याचा धरलेला आग्रह मोडून काढण्यासाठी पाटी मुद्दाम उर्दूत लागली असली, तरी हा वाद केवळ भाषिक समजणे आत्मघातकी ठरेल. हा वाद विशिष्ट इस्लामी आक्रमक शैलीतून खेळला जात आहे आणि त्याचा उद्देश मुंबईवरील मराठी, पर्यायाने हिंदु नेतृत्वाला आव्हान देणे, हा आहे. समाजवादी पक्षाच्या नेत्यांना सांगितले पाहिजे की, या देशातील मुसलमानांचे पूर्वज काल-परवापर्यंत हिंदु होते. या देशातील विविध प्रादेशिक भाषांपैकी एखादी हीच मुसलमानांची मातृभाषा असू शकते. या देशातील काही थोडे मुसलमान आणि हिंदूही उर्दूत लिहिणे पसंत करत असतील; पण ती त्यांची मातृभाषा होत नाही; परंतु `तसे नाही' म्हणणे आणि उर्दूचा आग्रह धरणे, याचा वेगळा अर्थ होतो, जो हिंदूंनी समजून घेतला पाहिजे. मुस्लीम लीग १९०६ मध्ये स्थापन झाली. जर हिंदूंशी जुळवून घेतले, तर ओढ्याने सागरात विलीन झाल्यासारखे होईल, म्हणून `हिंदूंना अमृत ते मुसलमानांना विष', असे समजून प्रत्येक विषयात वेगळी राहुटी उभारायची, असे तेव्हा जे ठरले, ते १०० वर्षे उलटली, तरी मुसलमानांच्या मनातून गेलेले नाही. जाणारही नाही; कारण अशा वेगळया राहुट्या उभारून पाकिस्तान निर्माण करता येते, हे त्यांना माहीत आहे. तेव्हा पाकिस्तान उत्पन्न व्हायला नको असेल, तर आपल्या आजूबाजूचे मुसलमान वेगळा तंबू उभारणार नाहीत, याची काळजी हिंदूंनी घेतली पाहिजे. मुसलमान भिवंडीत सरकारला पोलीस ठाणे बांधू देत नाहीत. पालिका मुख्यालयात मराठीला लाथ मारून उर्दूत पाटी लावायची, या चालीचा अर्थ असा होतो की, मुसलमान जी भूमी व्यापतो, तेथे इस्लामचे राज्य सुरू होते. ही मुसलमानांमधील विषारी नांगी ठेचून काढली नाही, तर फाळणीच्या वेळी मुसलमान जसे आक्रमक झाले, तसे पुन्हा होण्याची संधी आपण त्यांना देऊ. महाराष्ट्र विधानसभेत-परिषदेत ज्यांना मराठी येत नव्हते, त्यांची हिंदी व इंग्रजीतील भाषणे आपण शांतपणे ऐकून घेतली आहेत; कारण आपल्याला मराठीत बोलता येत नाही, याची खंत त्या आमदारांना होती. महापालिकेतील काही नगरसेवक मराठीत न बोलणे, हा अभिमानाचा विषय समजतात, याला आक्षेप आहे. कन्नड आणि तेलगू या भाषा अभिजात भाषेचे स्थान मिळावे म्हणून प्रयत्नशील आहेत. मराठीची मात्र विटंबना होत आहे; कारण मराठी राज्यकर्त्यांना खुर्ची टिकवण्यापेक्षा मोठे ध्येय दिसत नाही. मुसलमानांना प्रसन्न करून खुर्ची टिकवता येत असेल, तर हे विलासी राज्यकर्ते मराठीचा बळी देण्यास कमी करणार नाहीत !
- सुघोष
Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments