संसदेच्या दोन्ही सभागृहात महाराष्ट्राचे ६७ खासदार आहेत. त्यापैकी नऊजण केंदात मंत्री आहेत. यापैकी एकालाही संसदेत अथवा संसदेबाहेर ज्या मुद्याच्या पायावर हे आंदोलन उभे आहे, त्याबाबत मराठी मन भावनिकदृष्ट्या इतके संवेदनशील का बनले? देशभर महाराष्ट्राची बदनामी सुरू असताना सुसंस्कृत महाराष्ट्र गप्प का आहे? महाराष्ट्राची नेमकी व्यथा आणि वेदना काय? याविषयी भूमिका दिल्लीत व्यक्त करता येऊ नये, हे महाराष्ट्राचे दुदैर्वच नाही काय?
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links