संयमी अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याचा आक्रोश करणार्‍या काँग्रेसवाल्यांना हिंदु देवतांची हुसेनकृत नग्न चित्रे दिसत नाहीत का ?
बारा जूनच्या `दै. सामना'मध्ये महसूलमंत्री श्री. नारायण राणे यांच्या स्त्री रूपात छापलेल्या उपहासात्मक चित्रामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली. राणेसमर्थकांनी राज्यभर वादंग माजवला. त्यांनी पुणे येथील `दै. सामना'च्या कार्यालयावर हल्ला केला.




या सर्व घटनाक्रमांवर उपमुख्यमंत्री श्री. रा.रा. पाटील यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. ``एखाद्या जबाबदार व्यक्‍तीची अशी विटंबना करणे व्यक्‍तीश: मला आवडलेले नाही. ही कृती चुकीची आहे. `दै. सामना'कडे लिखाणस्वातंत्र्य आहे. असे असले तरी ते स्वातंत्र्य संयमी असावे. हा संयम कोणाच्या बाजूने सुटला आहे, हे तपासले जाईल,'' असे आश्‍वासन श्री. पाटील यांनी दिले.
अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याचा उपभोग घेत असतांना त्यापाठोपाठ आपल्याकडे समाजमन जपण्याची जबाबदारी येत असते. मग तो साहित्यिक असो, वक्‍ता असो; पत्रकार असो, नाट्यनिर्माता असो वा चित्रे काढणारा चित्रकार असो...! या सर्वांनीच अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याचा अतिरेक करू नये. उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रतिक्रियेतून अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याचा असाच वेध घेतलेला दिसत आहे. `दै. सामना'मध्ये महसूलमंत्री श्री. नारायण राणे यांच्याविषयीचे प्रसिद्ध झालेले सचित्र वृत्त हे या निमित्ताने गृहमंत्र्यांना `संयमी स्वातंत्र्या'ची आठवण करून देणारे ठरले; कारण राज्यात आज दोन्ही काँग्रेसची सत्ता आहे आणि त्यात राज्याच्या गृहमंत्रालयाची जबाबदारी श्री. पाटील यांच्याकडेच आहे. याचे भान ठेवावे लागल्याने त्यांनी ताबडतोब या प्रकरणामध्ये `वृत्तपत्रांच्या लिखाणस्वातंत्र्या'ची ढाल पुढे केली. गृहमंत्र्यांना `संयमी स्वातंत्र्या'बद्दल इतकी कणव आहे, तर मग भारतमातेचे व कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धास्थानी असलेल्या हिंदूंच्या देवतांचे नग्न व अश्लील चित्रे काढणारे राष्ट्रद्रोही व हिंदुद्वेष्टे चित्रकार म.फि. हुसेन अजूनही फरार का ? हुसेन यांनी ज्या प्रमाणात त्यांच्याकडील अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याचा अतिरेक केला आहे, त्याला कदापी क्षमा नाही. अभिव्यक्‍ती स्वातंत्र्य, संयमी स्वातंत्र्य, यांवर बोलतांना गृहमंत्र्यांना प्रथम याचे उत्तर द्यावेच लागेल. हुसेन यांच्या विरोधात १ हजार २५० तक्रारी दाखल झालेल्या आहेत. त्यांनी हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत, हे शेंबडे पोरदेखील सांगेल; पण हुसेन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी मिळवा, असे कायदा सांगतो. मग सरकार चालवणारे गृहमंत्री बाराशेहून अधिक तक्रारींकडे अजून दुर्लक्ष का करत आहेत ?
नाटकांमधून राजरोसपणे हिंदु धर्म, देवता, संत, राष्ट्रपुरुष यांची टिंगलटवाळी केली जात आहे. अशा अनेक नाटकांच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने सनदशीर व लोकशाही मार्गाने आंदोलने केली आहेत. नाट्यनिर्मात्यांकडून केला जाणारा अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याचा हा अतिरेक समितीने वेळोवेळी शासनाच्या नजरेस आणून दिला आहे. तेव्हा नाट्यनिर्मात्यांना `संयमी स्वातंत्र्या'चे डोस पाजावेत, असे गृहमंत्र्यांना का वाटत नाही ? साहित्य, कला, संस्कृती, जाहिरात या सर्व माध्यमांतून हिंदु धर्म, धर्मग्रंथ, देवता, संत यांना लक्ष्य केले जाते. त्यासंदर्भातही सरकारला सजग करण्याचे काम हिंदु जनजागृती समिती करत आहे; पण तरीही या सर्व माध्यमांचा `अभिव्यक्‍ती स्वातंत्र्या'चा हा खेळ का थांबत नाही ? `दै. सामना'मधील एका वृत्तामुळे राज्यभर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला. त्यामुळे `दै. सामना' ला `लिखाणस्वातंत्र्य संयमी असावे', असे सांगणार्‍या गृहमंत्री श्री. रा.रा. पाटील यांना उपरोक्‍त सर्व दाखले देत आम्हाला विचारावेसे वाटते की, तेव्हा कुठे गेला होता संयमी स्वातंत्र्याचा विचार !
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links