लोकसभा निवडणूक निकालामध्ये मुंबई-ठाण्यात युतीची धुळधाण उडाली. त्यात मनसे फॅक्टर खूपच प्रभावी ठरला होता. दक्षिण मुंबईत बाळा नांदगावकरांनी मोहन रावलेंना तिस-या क्रमांकावर टाकलंच, पण इतर मतदारसंघातही मनसेच्या उमेदवारांनी सव्वा-सव्वा लाख मतं मिळवली आणि त्याचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला झाला. राम नाईक, गजानन कीर्तिकर, किरीट सोमय्या यांच्या अगदी ‘ शुअर ’ मानल्या जाणा-या जागाही युतीला गमवाव्या लागल्या. त्यामुळे त्यांच्या गोटात सुतकी वातावरण होतं आणि मनसेच्या नावानं बोटं मोडली जात होती. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि इतर शिवसेना-भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या, तर मनसेबद्दलचा त्यांच्या मनातला विखार सहज लक्षात येईल
परंतु, त्यांचं हे वागणं म्हणजे ‘ रडीचा डाव ’ असल्याची प्रतिक्रिया आज अनेक चर्चांमध्ये व्यक्त होत होती. ‘ मराठी माणसाचं काय होणार, हे राज ठाकरेंनाच जाऊन विचारा ’ , या उद्धव यांच्या विधानाची चर्चा तर शिवसैनिकांमध्येही होती. उद्धव स्वतःच मनसेला मोठं करत आहेत , ‘ मराठीचे कैवारी ’ म्हणून राज यांना प्रमोट करत आहेत, असा त्यांचा सूर होता. राज यांना दोष देण्यापेक्षा, सव्वा ते दीड लाख मराठी मतं, तेही आपल्या बालेकिल्ल्यातली, मनसेकडे जाण्याचं कारण काय, याचं आत्मपरीक्षण सेनेनं करायला हवं, असं मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केलं आहे.
Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments