मानापमानाचा अंक मारहाणीपर्यंत लांबवणाऱ्या मनसेचे सरचिणीस प्रकाश महाजन यांची पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी पक्षातून हकालपट्टी करून पक्षात सुरू असलेल्या वादावर पडदा पाडला. जिल्हा संपर्कप्रमुख कर्णबाळा दुनबळे यांना मारहाण करणाऱ्या महाजन यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत राज यांनी त्यांची हकालपट्टी जाहीर केली. त्याचवेळी पक्षशिस्त मोडल्याबद्दल दुनबळे यांना सर्व पदांवरून हटविण्यात आले आहे. 'काही पदाधिकारी वय वाढले तरी अजूनही बाल्यावस्थेतच आहेत,' असा टोलाही राज यांनी महाजन यांना लगावला.
3 Comments   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links