११ कोटींच्या महाराष्ट्रात ९ कोटी मराठी माणसांना गृहित धरलं जातं आणि २ कोटी परप्रांतियांना चोंबाळलं जातं... हा काय प्रकार आहे ? माझ्या आंदोलनानंतर मराठी माणूस छाती बाहेर काढून चालायला लागलाय. त्यामुळे इतरांची ‘ फाटली ’ आहे.. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ‘ मटा डॉट कॉम ’ ला बिनधास्त , बेधडक मुलाखत देताना बोलत होते.

राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील आपल्या निवासस्थानी ‘ मटा ऑनलाइन ’ टीमशी तब्बल दोन तास मनसोक्त संवाद साधला. कसलाही आडपडदा न ठेवता... तोही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तसबिरीला साक्षी ठेवून... निमित्त होते ‘ एनआरएम डे ’ चे.. ! जगभर आपल्या कर्तृत्वाची पताका फडकावणा-या नॉन रेसिडेंट महाराष्ट्रीयांच्या सन्मानाचा हा दिवस. यंदाच्या वर्षी वाचकांच्या मनातील प्रश्न आम्ही थेट राज ठाकरे यांना विचारले आणि त्यांनीही नेटीझन्सच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.
1 Comment   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links