महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख श्री. राज ठाकरे यांना मंगळवारी सकाळी अटक झाली, ती दिल्लीच्या दबावामुळे. हा दबाव रेल्वेमंत्री श्री. लालूप्रसाद यादव यांनी निर्माण केला. संपूर्ण महाराष्ट्र हिंसाचारी आहे, परप्रांतियांच्या विरोधात आहे, कायदा आणि सुव्यवस्था यांचे तेथे वाटोळे झाले आहे, अशी महाराष्ट्राची प्रतिमा देशभर निर्माण करण्यात विघ्नसंतोषी लोकांना यश आले आहे.

वास्तविक दिल्लीत सर्वश्री शरद पवार आहेत, सुशीलकुमार शिंदे आहेत, पृथ्वीराज चव्हाण आहेत व अंतुले आहेत. यांना महाराष्ट्राच्या वतीने बोलता आले असते; पण कोणीही तोंड उघडायला सिद्ध नाही. आज मनसे नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र विशिष्ट संकटात सापडला आहे; परंतु महाराष्ट्राच्या वतीने बोलणारा एकच एक नेता पुर्‍या देशात सापडत नाही. केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांचे काम केवळ राज ठाकरे यांना अटक करणे नाही, तर सर्व राज्यांमध्ये समतोल राखणे, हे आहे. लालूप्रसाद, रामविलास व अमरसिंह या नेत्यांना कसलीही नीतीमूल्ये नाहीत. लुटालूट करण्यासाठी ते राजकारणात आले आहेत. मुंबई ही लुटालूट करण्याची मोठी जागा आहे, हीच त्यांची भावना आहे. आपापल्या राज्यातील लोकांना राष्ट्रप्रेम आणि नागरिकांची कर्तव्ये ते शिकवत नाहीत. या नेत्यांची इस्लामी आतंकवादाविषयीची भूमिका सौम्य असते. राज ठाकरे यांना अफझलपेक्षा महाभयंकर माणूस वाटतो, म्हणून शिवराज पाटील आणि शरद पवार यांनी तोंड उघडले पाहिजे आणि `नेहमी महाराष्ट्रावर अन्याय करत रहाण्याची भूमिका राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने परवडणारी नाही’, असे त्यांनी सांगितले पाहिजे. बेळगावमध्ये ५० वर्षे मराठी माणसाचे खच्चीकरण चालू आहे. त्यावर लालू, पासू आणि मंडळी मौन बाळगून आहेत; पण मनसे कार्यकर्त्यांकडून दोनचार बिहारींना दोनचार थपडा खाव्या लागल्या की, आकाश कोसळल्यासारखे हे लोक गळा काढणार. महाराष्ट्राची बाजू सत्याची असूनही आरोपीच्या पिंजर्‍यात महाराष्ट्राला उभे केले आहे. केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील असतांना या न्यायालयातून त्या न्यायालयात राजची नव्हे, तर महाराष्ट्राची फरपट चालली आहे. उत्तरप्रदेशात आणि बिहारमध्ये इमाम बुखारीला आणि इस्लामी आतंकवाद्यांना अटक करण्याची छाती स्थानिक पोलिसांना होत नाही. हिंदुत्ववाद्याची ससेहोलपट होत आहे. याचा विकृत आनंद महाराष्ट्रातील नेत्यांना होणे साहजिकच आहे.
- सुघोष


निगडीत वृत्त : शरसंधान

सचिन आणि सावरकर ! : 2008-10-21
नेहरू आणि नोबेल पारितोषिक : 2008-10-16
मुग्धा आणि जीवनसंगीत : 2008-10-14
मुखी असो द्यावे हरिनाम ! : 2008-10-07
पळू नका, देव कुठे जात नाही ! : 2008-10-02
लता मंगेशकर एक ऋषीतुल्य गायिका : 2008-09-30
राजनाथ सिंग मातोश्रीवर : 2008-09-25
आतंकवाद आणि मुलायमसिंग : 2008-09-23
शिवराज, मदनलाल आणि जीना : 2008-09-18
सलमानचा गणपति आणि फतवा : 2008-09-16
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links