इथे महिला सुरक्षित नाहीत, कार्यकर्ते बलात्कार करतात, असे काहीजण म्हणतात. बलात्कार करा, असा मी काही पक्षादेश काढलेला नाही. एखाद्या कार्यकर्त्याचे डोके फिरले, तर कुठलाच पक्ष काहीच करू शकत नाही, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

शेपट्यांचे काय झाले?

म्हाडावरील मोर्चा दरम्यान सर्वसामान्यांवर अन्याय करणाऱ्या बिल्डरांच्या शेपट्या धरून त्यांना बिळातून बाहेर काढण्याचा दावा करण्यात आला होता. मात्र कालच्या 'सामना'मध्ये वरून खालपर्यंत सगळ्या शेपट्याच दिसत होत्या, असे सांगत राज यांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना टोमणा मारला.
11 Comments   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links