लोकसभेच्या निवडणुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्रपणे लढणार असून मुंबईतील सहाही जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी केली. आम्ही कोणाला पाडण्यासाठी नव्हे तर जिंकण्यासाठी लढणार आहोत, असे राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात निक्षून सांगितले.
मुंबईच्या सर्व, तर महाराष्ट्रातील काही ठराविक जागा मनसे लढवेल. मराठीचा मुद्दा आमच्यासाठी महत्त्वाचा असून तो आम्ही सोडणार नाही. तीच आमची खरी ओळख आहे, असे सांगताना लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आम्हालाही आमची ताकद कळेल, अशी अपेक्षा राज यांनी व्यक्त केली.
2 Comments Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments
jai ho
mann se re
mann se re....