मराठी पाकिस्तानचे संभाव्य निर्माते आणि
कु-हाडीचा दांडा गोत्यास काळ झालेले आणि
प्रख्यात मूषकराज आणि विख्यात सुपारीमॅन
मा . स्वरराज श्रीकांत ठाकरे यांस -

तसेच आयत्या बिळावर नागोबा झालेले आणि मराठी माणसांचा घात केलेले आणि फालतू सल्लागारांच्या गराड्यात असलेले मा . उद्धव बाळ ठाकरे यांस -

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ च्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि विशेषत : उत्तर प्रदेश व बिहार आदी राज्यांतील लोकांच्या मनोरंजनार्थ आपण दोघा बंधूंनी आतापर्यंत जे कष्ट आणि मेहनत घेतली आहे ती बघून आमची मराठी छाती १३ इंच फुगून आली आहे . लहानपणी आम्ही काळू - बाळूचा तमाशा बघितला होता . लय भारी जोडी होती . असे एक एक खेळ लावायचे की ज्याचं नाव ते . त्यानंतर इतक्या वर्षांनी आपल्या जोडीचा तमाशा खेळ बघण्याचा योग आला आहे . आपल्या तमाशा बारीला ' ठाकरे अॅन्ड ठाकरे ' हे योग्य नाव आपण दिलेले आहे . मराठीसाठी भांडणाऱ्यांनी इंग्रज नाव दिलं म्हणून काही लोक नाक मुरडतील , टीका करतील , पण तिकडे दुर्लक्ष करावे . कारण की कॉपोर्रेट माकेर्टिंग करावयाचे झाल्यास मराठी नाव फारसे चालणार नाही.
2 Comments   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links