महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ठार मारण्‍याची सुपारी देणा-या बिहारी लोकांच्‍या एका संघटनेची पंजाब पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. याच संस्थेने राज यांना ठार मारणा-यास ५१ लाख रुपयांचे पारितोषिक देण्‍याची घोषणा केली होती.

लुधियाना येथे वास्‍तव्‍यास असलेल्‍या ‘ अखिल भारतीय पूर्वांचल विकास परिषद ’ या बिहारींच्‍या संघटनेने राज यांच्‍यासाठी ही सुपारी जाहीर केली होती. .
या घटनेची चौकशी केली जात असून लवकरच दोषींना अटक केली जाणार असल्‍याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

महाराष्ट्रात राहण्याचा सर्वांना अधिकार आहे. त्यामुळे राज ठाकरे उत्तर भारतीयांना मुंबई आणि महाराष्ट्रात येण्यापासून रोखू शकत नाही, त्यामुळे जो कोणी राज ठाकरे यांना ठार मारेल त्याला ५१ लाख रुपयांचा इनाम देण्याची घोषणा या बिहारी संघटेनेने केली होती.
दरम्यान या प्रकारचे एक कोटीचे बक्षीस देण्याची घोषणा करणा - या उत्तरप्रदेशमधील समाजवादी पार्टीचे आमदार मंगेश समरस्ते यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे.

एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना आमदार समरस्ते यांनी वक्तव्य केले असल्याचे मनसेचे प्रवक्ते शिरिष पारकर यांनी सांगितले होते . आमदारांच्या या धमकीमुळे राज यांच्या जीवाला धोका असून पोलिसांनी सपाच्या आमदारावर कारवाई करावी , अशी मागणी त्यांनी केली .
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links