वसई-विरार महापालिकेत समाविष्ट केलेली ५३ गावे वगळण्यात यावी या मागणीसाठीच्या सर्वपक्षीय आंदोलनास रविवारी रात्री हिंसक वळण लागून ग्रामस्थांच्या उदेकात आमदार हितेंद ठाकूर, खासदार बळीराम जाधव हे समर्थकांसह जखमी झाले. 'बदला' म्हणून सोमवारी ठाकूरसमर्थकांनी विरार-नालासोपारा भागात धुमाकूळ घातला. त्यामुळे आगाशी, बोळिंज येथे संचारबंदी लागू केली असून १५ जणांना ताब्यात घे्ण्यात आले आहे.
वाघोली नाका येथे 'वसई विकास मंडळा'च्या फाडण्यात आलेल्या बॅनरच्या पाहणीसाठी ठाकूर, जाधव रविवारी रात्री समर्थकांसह आले होते. 'हे कुणी केले?' अशी विचारणा त्यांनी केली असता प्रा. विन्सेंट परेरा यांनी वाद चचेर्तून मिटविण्याची विनंती केली असता ठाकूर यांनी त्यांच्या कानशिलात भडकावली. महिलांनी ठाकूर यांना जाब विचारला असता एका महिलेवरही त्यांनी हात उगारला.
1 Comment Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments
Hitendra thakur ha ek gund ch aahe....aata paryant bahi thakurchya jivaavar udya marnarya hya bhavala maarle he chnglech zaale....Karave tase bharave....