ज्वारी, बाजरी, मका अशा धान्यापासून मद्यार्कनिमिर्ती करण्यासाठी नवे परवाने देऊन 'महाराष्ट्राची मधुशाला' करण्याचा राज्य सरकारचा इरादा लोकविरोधामुळे आडवा पडला असतानाच आता 'महाराष्ट्राची मधुशाला-पार्ट २'ची तयारी सुरू झाली आहे. या 'मद्यनाट्या'त काजू, चिकू आणि जांभूळ ही मुख्य पात्रे असून निर्मात्याच्या भूमिकेत खुद्द राज्य सरकारच आहे!
आता, 'महाराष्ट्रात काजू, जांभूळ आणि चिकूपासून मद्यनिमिर्ती करण्याचा राज्य शासनाचा विचार सुरू आहे', अशी घोषणा उत्पादन शुल्कमंत्री गणेश नाईक यांनी सोमवारी विधान परिषदेत करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. शिवसेनेचे परशुराम उपरकर यांनी धान्यापासून मद्यनिमिर्ती करण्याच्या शासनाच्या धोरणासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावर २० ऑगस्ट २००९ नंतर धान्यापासून मद्यनिमिर्ती करण्याकरिता नवे परवाने दिले नसल्याचे शासनाने स्पष्ट केले. काजूपासून मद्यनिमिर्ती करण्याचा सरकारचा विचार आहे का, असे उपरकर यांनी विचारले असता, काजूच नव्हे तर जांभूळ, चिकूपासूनही मद्यनिमिर्ती करण्याचा विचार सुरू असल्याचे नाईक यांनी सांगितले.
Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments