विधिमंडळ हे संसदीय लोकशाही पद्धतीतील सर्वोच्च व्यासपीठ म्हणून ओळखले जाते. विधानसभेला लोकशाहीचे मंदिर म्हटले जाते. तरीही दुष्काळाच्या प्रश्नावर चर्चा असताना राज्याचे कृषीमंत्री बाळासाहेब थोरात पहिल्या दिवशी गायब होते. दुस-या दिवशी मदत व पुनर्वसनमंत्री डॉ. पतंगराव कदम गैरहजर होते. दोन्ही मंत्र्यांनी, अध्यक्षांनी अगोदर पत्र लिहून आपण उपस्थित राहू शकणार नसल्याचे कळवले होते. पण हा शेवटी उपचाराचा भाग झाला. चर्चेला उत्तर देण्यासाठी मंत्री हजर नाहीत म्हटल्यावर विरोधकांचा पारा चढणारच. थोरात म्हणे दिल्लीला कार्यक्रमाला गेले होते तर कदम आंध्र प्रदेशमध्ये एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला गेले होते. अधिवेशन चालू असताना मंत्रीगण बाहेरचे कार्यक्रम स्वीकारतात कसे? सभागृहातील कामाविषयी आस्था नाही आणि मंत्री म्हणून जबाबदारीचे भान नाही, हेच त्याचे कारण आहे.
Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments