सत्ताधारी पक्ष असावेत तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारखेच. सत्ताधाऱ्यांनी जसे वागायचे तसेच ते वागत आहेत. सत्ताधाऱ्यांनी कसे बेदरकारपणे असले पाहिजे. तो नसानसांत मुरला पाहिजे. त्याचा दिमाख पदोपदी लोकांना जाणवला पाहिजे. सत्ता ही काही साधीसुधी गोष्ट नसते. दहाबारा कोटी लोकांवर राज्य करायचे असते. त्यासाठी राज्यघटनेने खास त्यांना सार्वभौमत्व दिले आहे. सत्ता ही पाच वर्षांची असली म्हणून काय झाले. पण या पाच वर्षांत सत्ताधारी हे मायबाप जनतेचे राजेच असतात. राजाने राजासारखे वागायचे नाही तर काय भिकाऱ्यासारखे. सत्ता भोगण्यासाठीच घटनेने तरतूद केलेली असल्याने पाच वषेर् सुखाने ती उपभोगली पाहिजे. आधीच्या पाच वर्षांत हेच सत्ताधारी भिजलेल्या कबुतरासारखे कुडकुडत होते. सतत डगडगणारी खुचीर् गच्च धरून तोंड कसनुसं वेंगाडत होते. तोंडावरची माशीही उडत नव्हती. त्यामुळे हे सत्ताधारी आहेत की रिटायरमेंटला आलेला चपरासी आहे, हे कळतच नव्हते. पण आता बरे झाले. गेल्या चार वर्षांत मागची सगळी कसर भरून काढली. सुखाने काठोकाठ भरलेला हा प्याला अजून वर्षभर प्यायचा असल्याने त्यांना कुणी काही बोलायचा प्रश्ान्च उपस्थित होत नाही. त्यांना पाहिजे तसा कारभार ते करणार. सटवाईनेच त्यांच्या कपाळावर सत्तेचा मळवट भरलेला असल्याने पक्षश्ाेष्ठींनाही शहाणपण शिकविण्याचा अधिकार उरला नाही. आता श्ाेष्ठींच्याही ते चांगलेच लक्षात आले आहे. चार वर्षांत त्यांनी युक्तिच्या गोष्टी सांगितल्या. बाबापुता केले. सुनेला कळावे म्हणून लेकीवर डाफरले. परिणाम शून्य. मग जाहीरपणे इशारे दिले. तरीही सत्तेतील अनुयायी ढिम्म्. तेव्हा त्यांना टोटलच लागेना. मग त्यांच्या लक्षात आले की, आता आपली चप्पल यांच्या पायाला आलीय. तोंडाची वाफ दवडून काहीच उपयोग नाही. श्ाेष्ठी झाले म्हणून काय झाले प्रत्यक्ष तळे राखील तोच पाणी चाखील. हा जगाचा न्याय आहे. त्यामुळे श्ाेष्ठींनी आता काही बोलायचेच सोडून दिले.
2 Comments Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments
ह्याला सहमतीच राजकारण अस म्हणतात. ह्या राजकारणात कोणाचाच पराभव नसतो शिवाय आर. के. लक्ष्मनांच्या कॉमन मॅनचा.
हे सारे बघुन सामन्य जनतेने काय करावे हाच मोठा प्रश्न आहे...
यांना थांबवणार कोण? सामान्य जनतेला नियमाने वागायला सांगणारे हे लोक स्वतः मात्र
नियम धाब्यावर बसवतात ! आणि त्यांना रोखणारे कोण तर हेच ! म्हणजे उंदराला मांजरची साक्ष!