साहीत्य - १/२ किलो छ्योट्या आकाराची वांगी, १ लिंबाएवढी चिंच, तिखट, मीठ, गुळ, २ चमचे काळा मसाला, २ टेस्पुन दाण्याचे कूट, २ टेस्पुन टिळाचे कूट, ३ टेस्पुन सुक्या खोबर्याचा भाजलेला कीस.

क्रुती - चिंच भिजत घालुन कोळ तयार करावा. वांग्याला चिरा देउन पाण्यात टाकावी.

चिंचेचा कोळ, तिखट, मीठ, गुळ, मसाला, दाण्याचे कूट, खोबर्याचा भाजलेला कीस असे मिश्रण करुन घ्यावे व हे मिश्रण वांग्यात भरावे.
जरा जास्त तेलाची हिंग, मोहरी, हळ्द घालुन फोडणी करावी. त्यात वांगी घालावी. अलगद ढवळावे. थोडे पाणी घालावे. वरती झाकण ठेवावे व झाकणवर पाणी घालावे. मंदाग्निवर असु द्यावे. भाजी शिजली की उतरवावे. वरुन कोथिंबीर, खोबरे घालावे.
11 Comments   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links