मुंबई म्हणजे देशाची आर्थिक राजधानी. देशाच्या निरनिराळ्या कोप-यांतून लोकांचे लोंढेच्या लोंढे इथे नशीब आजमावण्यासाठी येतच असतात. मुंबईचा गुणच असा की इथे कुणी उपाशी रहात नाही. काही ना काही काम मिळून जातं. हेच तत्त्व मनाशी बाळगून ’तो’ही मुंबईत येऊन थडकतो. आधीच गावाहून मुंबईला आलेल्या मित्राकडे काही दिवस काढतो. मग नोकरीच्या जाहिरात पहाता पहाता त्याला एक चांगल्या नोकरीची जाहीरात दिसते. त्याला कौतुक वाटतं, "हिंदी वर्तमानपत्रात महाराष्ट्रातल्या नोकरीची जाहीरात!"
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links