वनडे क्रिकेटचा थरार हैदराबादी प्रेक्षकांनी तसेच टीव्हीवर सामना बघणाऱ्या कोट्यवधी प्रेक्षकांनी गुरूवारी अनुभवला... २२ षटकार, ५५ चौकारांच्या आतषबाजीसह तब्बल ६४७ धावांची लयलूट पाचव्या वनडेत झाली. या थरारक सामन्यात भारताच्या पदरी चार धावांनी पराभव पडला तेव्हा सगळ्यांनाच चुटपुट लागून गेली.
मुख्य म्हणजे सचिनच्या १७५ धावांच्या अफलातून खेळीनंतरही विजय हाती आला नसल्याची खंत जशी भारतीय क्रिकेटप्रेमींना होती, तशीच सचिनलाही... या सामन्यातील विजयामुळे सात वनडे सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने ३-२ अशी आघाडी घेतली असून आयसीसी वनडे रँकिंगमध्येही आपला अव्वल क्रमांक कायम राखला आहे.
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links